Skip to main content

Posts

Showing posts from June, 2023

नशीब बलवंत म्हणून जीवित हानी टळली . . .

      सातारा :  पु णे बेंगलोर महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या बसने अचानक पेट घेतला ही बस राज्य परिवहन  महामंडळाची विठाई बस होती. या बसने अचानक पेट घेतला आहे हे वाहन चालकाच्या आणि कंडक्टरच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तात्काळ बस थांबून प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढले.  त्यामुळे , यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.  या बसला अचानकपणे आग लागली आणि या आगे मध्ये राज्य परिवहन महामंडळाची 'विठाई बस' संपूर्णपणे जळून गेली.       हा घटनेचा थरार व ही घटना सातारा शहराजवळील आनेवाडी टोलनाक्याजवळ घडली आहे. ही माहिती काही क्षणार्धात तेथील आसपासच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली गेली. ही बातमी पसरल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने धाव घेतली आणि याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि सातारा नगरपरिषद व भुईंज कारखान्याच्या अग्निशामक दलाला ही माहिती तातडीने दिली. काही वेळाच्या आत अग्निशामकचे जवान तिथं दाखल झाले . परंतु त्यांना त्या बसपर्यंत येईपर्यंत त्या संपूर्ण बसणे पेठ घेतला होता आणि ती बस आगीमध्ये बघताच तेथील प्रवाशांमध...