Skip to main content

Posts

Showing posts with the label वैद्यकीय मदत

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात 'सायबर महागणपती' उत्साहात साजरा: रांगोळीतून सायबर सुरक्षेचा संदेश

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात 'सायबर महागणपती' उत्साहात साजरा: रांगोळीतून सायबर सुरक्षेचा संदेश पुणे हडपसर : २८ ऑगस्ट २०२५ क्विक हिल फाउंडेशन अंतर्गत आज अण्णासाहेब मगर महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त "सायबर महागणपती"चे अनोखे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील, आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश आरतीने झाली, ज्यामध्ये "सायबर महागणपती"ची विशेष आरती घेण्यात आली. आरतीचा मान प्रमुख पाहुणे आणि प्राचार्यांना देण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गणपतीच्या विविध रूपांसोबतच सायबर सुरक्षेचे महत्त्व दर्शवणारी आकर्षक रांगोळी रेखाटली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश रांगोळीच्या कलेद्वारे सायबर फसवणुकीपासून स्वत...

सौर ऊर्जा अभियानात अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची राज्यात द्वितीय तर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाला गवसणी

अण्णासाहेब मगर महाविद्यालयास सौर ऊर्जा जाणीव जागृती अभियान २०२५ स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पुणे: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया आणि विवा कॉलेज, विरार यांच्या सहकार्याने ५५५५५ तरुणांना सौर ऊर्जा जाणीव जागृती अभियान प्रशिक्षण उपक्रम दिनांक २१ व २२ जून २०२५ रोजी राबविण्यात आला होता. या स्पर्धेत सौर ऊर्जा जाणीव जागृती अभियान २०२५ स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयांस राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला.  यशदा (पुणे) येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सेंटर ऑफ एक्सलन्स कार्यशाळामध्ये या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवाळणकर यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, करिअर कट्टा समन्वयक डॉ. नीता कांबळे, भौतिकशास...

भारतातील एकूण राज्य केंद्रशासित प्रदेश आणि महाराष्ट्रातील जिल्हे

भारतातील एकूण राज्ये (28) आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल. केंद्रशासित प्रदेश (8) अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, लक्षद्वीप, दिल्ली, पुद्दुचेरी, लडाख, जम्मू आणि काश्मीर. महाराष्ट्रातील जिल्हे (३६) मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

संविधान निर्मितीवर आधारित माहितीचित्रपटाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात आयोजन

संविधान निर्मितीवर आधारित माहितीचित्रपटाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात आयोजन      पुणे (हडपसर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे फिल्म क्लब अंतर्गत दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी “संविधान निर्मिती” या विषयावर आधारित माहितीपर चित्रपटाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी भूषविले. राज्यशास्त्र विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला होता.      अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या कॉमर्स सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या या माहितीपर चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संविधान निर्मितीचा ऐतिहासिक प्रवास विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे उभा राहिला. यावेळी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “भारतीय राज्यघटनेचे पारायण झाले पाहिजे. संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून जीवनाला दिशा देणारी प्रेरणा आहे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावले...

हडपसर भैरोबानाला येथे संविधान साक्षरता कार्यक्रम संपन्न

भैरोबानाला येथे संविधान साक्षरता कार्यक्रम संपन्न हडपसर (दि. 13 ऑगस्ट): डॉ. तानाजी साळवे सोशल फाउंडेशनच्या वतीने भैरोबानाला, हडपसर येथील विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान साक्षरता  हा उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. बाबा आढाव यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालय तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते. त्यांनी संविधानातील तत्त्वांचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करावा, याबाबतही प्रेरणादायी विचार मांडले. या वेळी ५० ते ६० विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. तानाजी साळवे सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘Mass Gathering and Oath taking’ उपक्रम यशस्वी

  अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘Mass Gathering and Oath taking’ उपक्रम यशस्वी हडपसर, पुणे: दि. १२ ऑगस्ट २०२५ अण्णासाहेब मगर महाविद्यालयात मास गॅदरिंग आणि शपथ विधी हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात सायबर सुरक्षा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य  तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. तसेच उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, संगणक शाखेचे प्रमुख डॉ. विलास वाणी, प्रा. डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. जयश्री अकोटकर आणि प्रा. मनीषा गाडेकर उपस्थित होते. याशिवाय महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थीही उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पी.एस.आय सागर पोमन यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण आणि सोशल मीडिया ॲप्सचा ...

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी... हडपसर, पुणे: (१२ ऑगस्ट) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे ग्रंथालय आणि माहिती शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.  या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी, प्रा. अनिल जगताप, ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. संकपाळ यांनी आपल्या मनोगतात डॉ. रंगनाथन यांच्या "ग्रंथालयशास्त्रातील पाच नियम" यांचे महत्त्व उलगडून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक ग्रंथाल...

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुस्तक प्रेमी दिवसानिमित्त पुस्तक वाचन व गटचर्चा

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुस्तक प्रेमी दिवसानिमित्त पुस्तक वाचन व गटचर्चा पुणे हडपसर: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात संस्कृत दिन, आदिवासी दिवस व क्रांती दिन तसेच पुस्तक प्रेमी दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी ग्रंथालयाच्या सहकार्याने संस्कृत दिना निमित्त संस्कृत पुस्तके, क्रांती दिनानिमित्त इतिहास व क्रांती विषयक तसेच आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी साहित्य वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. वेगवेगळ्या विषयानुसार शिक्षकांचे गट तयार करून त्यांच्यात गट चर्चा घडवून आणली. गटचर्चेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी केलेल्या चर्चेचा सारांश गटप्रमुख प्रा. अभिलाष जगताप, डॉ. सुनील वाघमोडे, डॉ. सुजाता टापरे, प्रा. शशिकला वाल्मिकी, डॉ. किरण रणदिवे यांनी सादर केला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील पुस्तक लिहिणाऱ्या शिक्षक लेखकांचा सत्कार करण्यात आला. शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी वाचनाचे महत्व विशद करून पुस्तक वाचण्यासाठ...

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

   अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी पुणे, हडपसर १ ऑगस्ट २०२५: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती आणि प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या ग्रंथालययात हा कर्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. तसेच उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे , उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप , ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ, डॉ. लतेश निकम, डॉ. नाना झगडे, डॉ. जोशी, डॉ. गाढवे, डॉ. धोत्रे, प्रा. पावडे, डॉ. कवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमात दोन्ही थोर विभूतींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.   प्राचार्य  डॉ. घोरपडे यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी ...

१०१ रुग्णांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचे शिक्षण मंत्र्यांकडून कौतुक

  १०१ रुग्णांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचे शिक्षण मंत्र्यांकडून कौतुक मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ : राज्यातील गोरगरीब आणि शेतमजुरांना वैद्यकीय मदत मिळवून देणाऱ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यकर्त्यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तोंडभरून कौतुक केले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश महादेव गावडे आणि मंगेश खताळ यांच्यासह बारामती तालुका समन्वयक श्रीकृष्ण मूर्ती जगताप आणि त्यांच्या टीमने केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.  मागील दीड वर्षात या टीमने मुख्यमंत्री सहायता निधी आणि सामाजिक प्रयत्नांतून तब्बल १०१ रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. या मदतीचा लाभ प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील, गोरगरीब शेतकरी आणि शेतमजुरांना झाला आहे. या उपक्रमामध्ये विविध रुग्णालयांमधील उपचारांसाठी निधी उपलब्ध करून दिला गेला, ज्यामध्ये शस्त्रक्रिया, औषधोपचार, आणि इतर आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेश चिवटे आणि कक्ष प्रमुख राम र...

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा

  रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा           दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई सह्याद्री अतिथी गृह येथे शिवसेना वैद्यकीय टीमच्या वतीने व महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD  श्री मंगेश  चिवटे  व  कार्यालयाचे मुख्य कक्ष प्रमुख श्री राम राऊत  यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या वेळेस उपस्थित श्रीमती नीलमताई गोरे व महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बारामती तालुक्यातील लिमटेक गावचे सुपुत्र श्री . सतीश महादेव गावडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे उपजिल्हा समन्वयक बारामती सर्व टीम ने १०१ रुग्णांना सामाजिक कार्यातून व मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वरील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक मदत केली .  त्याबद्दल श्री . सतीश गावडे यांचा बारामती तालुक्यातील मोरगाव गावचे सुपुत्र श्री मंगेश खताळ व बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मीडिया पत्रकार श्रीकृष्ण मूर्ती जगताप शिवसेना मेडिकल सेलचे अध्यक्ष संतोष गोलांडे  ग्रामीण अध्यक्ष श्री अनिल...