अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुस्तक प्रेमी दिवसानिमित्त पुस्तक वाचन व गटचर्चा
पुणे हडपसर: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात संस्कृत दिन, आदिवासी दिवस व क्रांती दिन तसेच पुस्तक प्रेमी दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी ग्रंथालयाच्या सहकार्याने संस्कृत दिना निमित्त संस्कृत पुस्तके, क्रांती दिनानिमित्त इतिहास व क्रांती विषयक तसेच आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी साहित्य वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. वेगवेगळ्या विषयानुसार शिक्षकांचे गट तयार करून त्यांच्यात गट चर्चा घडवून आणली. गटचर्चेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी केलेल्या चर्चेचा सारांश गटप्रमुख प्रा. अभिलाष जगताप, डॉ. सुनील वाघमोडे, डॉ. सुजाता टापरे, प्रा. शशिकला वाल्मिकी, डॉ. किरण रणदिवे यांनी सादर केला.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील पुस्तक लिहिणाऱ्या शिक्षक लेखकांचा सत्कार करण्यात आला.
शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी वाचनाचे महत्व विशद करून पुस्तक वाचण्यासाठी आपल्या मित्र नातेवाईकांना प्रेरणा देण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. लतेश निकम, डॉ. दत्तात्रय संकपाळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...