अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘Mass Gathering and Oath taking’ उपक्रम यशस्वी
हडपसर, पुणे: दि. १२ ऑगस्ट २०२५ अण्णासाहेब मगर महाविद्यालयात मास गॅदरिंग आणि शपथ विधी हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात सायबर सुरक्षा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. तसेच उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, संगणक शाखेचे प्रमुख डॉ. विलास वाणी, प्रा. डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. जयश्री अकोटकर आणि प्रा. मनीषा गाडेकर उपस्थित होते. याशिवाय महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थीही उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पी.एस.आय सागर पोमन यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण आणि सोशल मीडिया ॲप्सचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले.
पीआय अश्विनी जगताप यांनी विशेषतः मुलींसाठी "सायबर सुरक्षा जागरूकता" सत्र घेतले. त्यांनी मुलींनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, स्वतःची वैयक्तिक माहिती (Personal Information) सुरक्षित कशी ठेवावी, तसेच ती कोणाकडूनही गैरवापर होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत सविस्तर सूचना दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मनोगताने झाली. त्यानंतर पाहुण्यांनी सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
उपक्रमाचा विशेष भाग म्हणून "सायबर वॉरियर्स" टीमच्या वतीने उपस्थितांना सायबर सुरक्षेची शपथ देण्यात आली. या शपथेच्या माध्यमातून सर्वांनी सायबर सुरक्षेचे नियम पाळण्याची आणि इतरांना जागरूक करण्याची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे आभार मानले. विशेष आभार QuickHeal Foundation Team च्या मार्ग दर्शनाचे. या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता लक्षणीयरीत्या वाढली.
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...