अण्णासाहेब
मगर महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
पुणे, हडपसर १ ऑगस्ट २०२५: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती आणि प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या ग्रंथालययात हा कर्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. तसेच उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ, डॉ. लतेश निकम, डॉ. नाना झगडे, डॉ. जोशी, डॉ. गाढवे, डॉ. धोत्रे, प्रा. पावडे, डॉ. कवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमात दोन्ही थोर विभूतींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
प्राचार्य डॉ. घोरपडे यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी अण्णाभाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीतील सामाजिक संघर्ष, वंचित समाजाचे वास्तव चित्रण आणि श्रमिक वर्गासाठी त्यांनी केलेले लेखन याचा परिचय करून दिला. ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते एक प्रभावी लोकशाहीर, विचारवंत, पत्रकार आणि सामाजिक क्रांतिकारक होते.
उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी आभार प्रदर्शन करत सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश सांगताना अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडला. तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून निश्चितच प्रेरणा घ्यावी, असे डॉ. मुळे म्हणाले.
या कार्यक्रमात अशोक शेकडे, जालिंदर मोरे,
अक्षय कोकरे, जीवन शेळके, साधना काळभोर, रेखा जंबे, आशा बांदल यांचे मोलाचे योगदान
होते. कार्यक्रमाच्या शेवटी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना सर्वांनी पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...