१०१ रुग्णांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचे शिक्षण मंत्र्यांकडून कौतुक
मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ : राज्यातील गोरगरीब आणि शेतमजुरांना वैद्यकीय मदत मिळवून देणाऱ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यकर्त्यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तोंडभरून कौतुक केले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश महादेव गावडे आणि मंगेश खताळ यांच्यासह बारामती तालुका समन्वयक श्रीकृष्ण मूर्ती जगताप आणि त्यांच्या टीमने केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
मागील दीड वर्षात या टीमने मुख्यमंत्री सहायता निधी आणि सामाजिक प्रयत्नांतून तब्बल १०१ रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. या मदतीचा लाभ प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील, गोरगरीब शेतकरी आणि शेतमजुरांना झाला आहे. या उपक्रमामध्ये विविध रुग्णालयांमधील उपचारांसाठी निधी उपलब्ध करून दिला गेला, ज्यामध्ये शस्त्रक्रिया, औषधोपचार, आणि इतर आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेश चिवटे आणि कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या सामाजिक कार्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवी जीवनशक्ती मिळाली आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या उपक्रमातील कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. "समाजातील वंचित घटकांसाठी केलेले हे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. गरजू लोकांना वेळेवर मदत मिळवून देणे ही आजच्या काळातील मोठी गरज आहे, आणि या टीमने हे कार्य उत्तम प्रकारे पार पाडले आहे," असे केसरकर म्हणाले.
बारामती तालुक्यातील वैद्यकीय मदत कक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही या उपक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भविष्यातही अशीच समाजसेवा करण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या शेवटी करण्यात आले.
https://ansnews24taas.blogspot.com/2023/08/blog-post_22.html
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...