भैरोबानाला येथे संविधान साक्षरता कार्यक्रम संपन्न
हडपसर (दि. 13 ऑगस्ट): डॉ. तानाजी साळवे सोशल फाउंडेशनच्या वतीने भैरोबानाला, हडपसर येथील विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान साक्षरता हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. बाबा आढाव यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालय तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते. त्यांनी संविधानातील तत्त्वांचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करावा, याबाबतही प्रेरणादायी विचार मांडले.
या वेळी ५० ते ६० विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. तानाजी साळवे सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...