अण्णासाहेब मगर महाविद्यालयात 'सायबर महागणपती' उत्साहात साजरा: रांगोळीतून सायबर सुरक्षेचा संदेश
पुणे हडपसर : २८ ऑगस्ट २०२५ क्विक हिल फाउंडेशन अंतर्गत आज अण्णासाहेब मगर महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त "सायबर महागणपती"चे अनोखे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील, आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश आरतीने झाली, ज्यामध्ये "सायबर महागणपती"ची विशेष आरती घेण्यात आली. आरतीचा मान प्रमुख पाहुणे आणि प्राचार्यांना देण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गणपतीच्या विविध रूपांसोबतच सायबर सुरक्षेचे महत्त्व दर्शवणारी आकर्षक रांगोळी रेखाटली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश रांगोळीच्या कलेद्वारे सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयीचा संदेश देणे हा होता. या कार्यक्रमात सायबर वॉरियर क्लब यांनी मोलाची भूमिका बजावली, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत झाली.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सायबर क्राईम आणि त्या पासून बचाव याबद्दल मार्ग दर्शन केले तसेच मोगल त्यांनी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील यांनी सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमाचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आणि उपप्राचार्य डॉ.शुभांगी औटी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्यावर प्रकाश टाकत, विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. याशिवाय, महाविद्यालयाच्या 'सायबर वॉरियर्स' टीमने पोस्टरच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. जयश्री अकोलकर, प्रा. अनिल जगताप, डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, रांगोळी स्पर्धेचे प्रमुख डॉ. दत्तात्रय टिळेकर आणि संगणक विज्ञान विभागाचे डॉ. विलास वाणी यांची विशेष उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षण श्रीमती भुजबळ सविता, श्रीमती खळदकर वसुधा आणि श्रीमती माळी दिपाली यांनी केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय टिळेकर यांनी केले आणि यांनी प्रमुख पाहुणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि मनीषा गाडेकर यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी एकूण 525 विद्यार्थी उपस्थित होते. सायबर सुरक्षेचा प्रभावी संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.




Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...