सौर ऊर्जा अभियानात अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची राज्यात द्वितीय तर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाला गवसणी
अण्णासाहेब मगर महाविद्यालयास सौर ऊर्जा जाणीव जागृती अभियान २०२५ स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक
पुणे: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया आणि विवा कॉलेज, विरार यांच्या सहकार्याने ५५५५५ तरुणांना सौर ऊर्जा जाणीव जागृती अभियान प्रशिक्षण उपक्रम दिनांक २१ व २२ जून २०२५ रोजी राबविण्यात आला होता. या स्पर्धेत सौर ऊर्जा जाणीव जागृती अभियान २०२५ स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयांस राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
यशदा (पुणे) येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सेंटर ऑफ एक्सलन्स कार्यशाळामध्ये या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवाळणकर यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, करिअर कट्टा समन्वयक डॉ. नीता कांबळे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रमाकांत जोशी, करिअर संसद मुख्यमंत्री ऋषीकेश सुतार यांनी हा पुरस्कार स्विकारला.
या प्रसंगी सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया अध्यक्ष प्रफुल्ल पाठक, संवाद-अ डायलॉग संस्थापिका मिथिला दळवी, आर्थिक साक्षरता तज्ज्ञ मार्गदर्शक डिंपल मित्तल, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र अध्यक्ष यशवंत शितोळे विभागीय प्राचार्य प्रवर्तक, पुणे विभाग करिअर कट्टा डॉ. नितीन घोरपडे, विभागीय प्राचार्य प्रवर्तक, पुणे विभाग करिअर कट्टा डॉ. संजय भारंबे, प्राचार्य प्रवर्तक पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...