ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी...
हडपसर, पुणे: (१२ ऑगस्ट) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे ग्रंथालय आणि माहिती शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी, प्रा. अनिल जगताप, ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. संकपाळ यांनी आपल्या मनोगतात डॉ. रंगनाथन यांच्या "ग्रंथालयशास्त्रातील पाच नियम" यांचे महत्त्व उलगडून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक ग्रंथालयाचा वापर करण्याचे आणि ज्ञानसंपादनासाठी वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे हे डॉ. रंगनाथन यांच्या विषयी बोलताना म्हणाले की रंगनाथन हे गणित विषयाचे प्राध्यापक असताना त्यांनी ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयांमध्ये अतुलनीय कामगिरी केली त्याचप्रमाणे कोलन वर्गीकरण पद्धती ही महत्त्वाची वर्गीकरण पद्धती तयार केली असं प्राचार्य आवर्जून म्हणाले. ग्रंथालय हे कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे हृदय असते. वाचनाची सवय विद्यार्थ्यांना बौद्धिक, नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध करते डॉ. रंगनाथन यांचे कार्य आजच्या डिजिटल युगातही तितकेच महत्त्वाचे आहे. पुस्तक हे मौल्यवान ज्ञानसंपत्तीचे भांडार आहे. या विचारांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती वाढविण्याचे आवाहन प्राचार्य यांनी केले.
कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनापासून कौतुक प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले. त्यानंतर सर्वांनी डॉ. एस. आर रंगनाथन यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्पअर्पण केले.
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...