उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन पुणे, हडपसर: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे ग्रंथप्रदर्शन प्रशांत अद्वैत फाउंडेशन व बोधक्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य प्रशांत यांच्या समृद्ध ग्रंथाचे भव्य तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार २३ जुलै रोजी पॅन इंडिया कंपनीचे सतीश के, बर्कलेझ कंपनीच्या रश्मी अघोर आणि नियती रॉय सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ, डॉ. गंगाधर सातव, डॉ. नाना झगडे, प्रा. ऋषिकेश कुंभार हे उपस्थित होते. या ग्रंथप्रदर्शनामध्ये ‘डीकोडींग सक्सेस’, ‘इन्फायनाइट पोटॅशियल अनलिमिटेड सक्से...
This Website about Maharashtra Yojana, Marathi News, information in Marathi, Learns more about GR, List, Aaple Sarkar, Bhashan, and Entertainment