बारामतीत करिअर कट्ट्याचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे: “उद्योजकतेसाठी सात मूलभूत बाबींचे ज्ञान आवश्यक” बारामती: बारामतीच्या शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात करिअर कट्टा राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. दिनांक १२ व १३ जानेवारी २०२५ या दोन दिवसीय कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून जवळपास एक हजार विद्यार्थी, शिक्षक, आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योजकता, करिअर विकास, आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या दिशा समजावून देणे हा आहे. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन: अधिवेशनातील दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे (प्राचार्य, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर तथा व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या मूलभूत तत्त्वांची सखोल माहिती दिली. नियोजन, संघटन, संदेशवहन, समन्वय, निर्णयक्षमता, प्रेरणा आणि नियंत्रण या सात बाबी यशस्वी उद्योजकतेचा पाया आहेत या प्रत्येक घटकाचा समतोल राखल्याशिवाय उद्योगक्षेत्रात यश मिळवता येणार नाही, असे ...
This Website about Maharashtra Yojana, Marathi News, information in Marathi, Learns more about GR, List, Aaple Sarkar, Bhashan, and Entertainment