बारामतीत करिअर कट्ट्याचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे: “उद्योजकतेसाठी सात मूलभूत बाबींचे ज्ञान आवश्यक”
![]() |
बारामती: बारामतीच्या शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात करिअर कट्टा राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. दिनांक १२ व १३ जानेवारी २०२५ या दोन दिवसीय कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून जवळपास एक हजार विद्यार्थी, शिक्षक, आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योजकता, करिअर विकास, आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या दिशा समजावून देणे हा आहे.
प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन:
अधिवेशनातील दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे (प्राचार्य, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर तथा व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या मूलभूत तत्त्वांची सखोल माहिती दिली. नियोजन, संघटन, संदेशवहन, समन्वय, निर्णयक्षमता, प्रेरणा आणि नियंत्रण या सात बाबी यशस्वी उद्योजकतेचा पाया आहेत या प्रत्येक घटकाचा समतोल राखल्याशिवाय उद्योगक्षेत्रात यश मिळवता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
इलेक्ट्रिक गाड्या आणि आत्मनिर्भर भारत:
सत्राचे प्रमुख वक्ते गौरव जोशी (उपसचिव, अवजड उद्योग मंत्रालय, भारत सरकार) यांनी भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील प्रगती आणि त्यातील तांत्रिक बाबींवर भर दिला. “इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती आणि बॅटरी तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आत्मसात केल्याने भारताचा आत्मनिर्भरतेचा प्रवास वेगाने होईल,” असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांचा सहभाग आणि प्रश्नोत्तर सत्र:
प्राचार्य डॉ. घोरपडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तर सत्राचे विशेष कौतुक केले. “विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे चर्चेत नवे मुद्दे उभे राहिले आणि त्यांना व्याख्यानापेक्षा प्रत्यक्ष संवाद अधिक प्रेरणादायी वाटला," असे त्यांनी सांगितले.
सरकारच्या योजनांवर भर:
डॉ. घोरपडे यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध इंटर्नशिप योजनांवर भाष्य केले. “सरकारने पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या इंटर्नशिप योजनांमुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगाशी जोडले जाईल. यामुळे रोजगार क्षमता वाढेल आणि स्वावलंबनाला चालना मिळेल,” असे ते म्हणाले.
उद्योजकतेची दिशा आणि भविष्यातील संधी:
गौरव जोशी यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेची गरज आणि नवकल्पनांची माहिती समजावून दिली. “आजच्या तंत्रज्ञानयुगात फक्त नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे तयार होणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले
कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद:
बारामतीत आयोजित या अधिवेशनाला राज्यातून विविध महाविद्यालयातून जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. प्रत्येक सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. त्यांच्या शंका, समस्या, आणि विचारांना मान्यवरांनी सविस्तर उत्तरे दिली जातात.
बारामतीतून उद्योजकतेचा नवा अध्याय:
करिअर कट्ट्याने विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळण्यासाठी नवचेतना मिळती आहे. “करिअर कट्टा हा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा उपक्रम ठरत असून, बारामतीतून सुरू झालेली ही चळवळ राज्यभर विस्तारली जाईल,” असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
नवीन पिढीला प्रेरणादायी दिशा:
या अधिवेशनाने युवकांमध्ये स्वावलंबन, उद्योजकता, आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजवली जात आहे. बारामतीमध्ये यशस्वीरीत्या हा उपक्रम संपन्न होत आहे.
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...