हरी नरके उर्फ हरी रामचंद्र नरके
जन्म ०१ जून १९६३ ते निधन ०९ ऑगस्ट २०२३
हे एक मराठी साहित्यातील जेष्ठ विचारवंत , प्राध्यापक , लेखक , अभ्यासू संशोधक , प्रभावी वक्ते होते. प्रा . नरके हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले या अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते .
शाहू, फुले, आंबेडकर विचारसारणीतील सर्वात मोठं नाव आणि परखड विचारवंत म्हणजे प्रा. हरी नरके
ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते . हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती , भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीची तपासणी , अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये , सामाजिक , आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस आदी गोष्टी करतो.
आपली मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू याचंप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून हरी नरके यांनीही मोठं योगदान दिले आहे
हरी नरके यांची काही निवडक पुस्तकं
१) महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन
२)महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा
ही पुस्तके आहेत .
अखेर एक चालतं बोलतं विद्यापीठ गेल्यानं आज पुरोगामी समाज पोरखा झाला .
https://ansnews24taas.blogspot.com/2023/08/blog-post.html
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...