अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी पुणे, हडपसर १ ऑगस्ट २०२५: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती आणि प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या ग्रंथालययात हा कर्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. तसेच उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे , उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप , ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ, डॉ. लतेश निकम, डॉ. नाना झगडे, डॉ. जोशी, डॉ. गाढवे, डॉ. धोत्रे, प्रा. पावडे, डॉ. कवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमात दोन्ही थोर विभूतींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. प्राचार्य डॉ. घोरपडे यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी ...
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...