असा कसा देवाचा देव बाई ठकडा।
देव एका पायाने लंगडा ग बाई ॥ ध्रु० ॥
गवळ्याघरीं जातो । दहींदूध खातो ।
करी दह्यादुधाचा रबडा ग बाई ॥ १ ॥
शिंकेंचि तोडितो । मडकेंचि फोडितो ।
पाडि नवनीताचा तो सडा ग बाई ॥२॥
वाळवंटी जातो । कीर्तन करितो ।
घेतो साधुसंतांसि झगडा ग बाई ॥ ३ ॥
एका जनार्दनिं । भिक्षा भिता बाई ।
देव एकनाथाचा बचडा ग बाई ॥ ४ ॥
- संत एकनाथ
https://ansnews24taas.blogspot.com/2023/08/blog-post_644.html
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...