मन वढाय वढाय उभ्या पीकांतलं ढोर
किती हांकला हांकला फिरी येतं पिकांवर।।
मन मोकाट मोकाट त्याले ठायीं ठायीं वाटा
जशा वार्यानं चालल्या पान्यावर्हल्यारे लाटा।।
मन लहरी लहरी त्याले हातीं धरे कोन?
उंडारल उंडारलं जसं वारा वाहादन।।
देवा, कसं देलं मन आसं नहीं दुनियांत
आसा कसा रे यवगी काय तुझी करामत।।
मन चप्पय चप्पय त्याले नहीं जरा धीर
तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर।।
देवा, आसं कसं मन आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनीं तुले आसं सपन पडलं !
- बहिणाबाई चौधरी
https://ansnews24taas.blogspot.com/2023/08/disclaimer.html

Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...