सिताराम येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणात शोककळा पसरली आहे
१२ सप्टेंबर येचुरी एक तत्त्वज्ञ आणि प्रभावी राजकीय नेता होते, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली माकप ने अनेक चळवळीच्या माध्यमातून सामाजिक विचारधारेला सशक्त केले त्यांच्या विचारशक्ती नेतृत्व होऊन आणि सामाजिक सिद्धांतावर आधारित विचारधारा त्यांच्या राजकीय आयुष्यातून नेहमीच चमकत राहिल्या.
त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच केरळचे मुख्यमंत्री फिनराई विजयन यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.
येचुरी यांच्या निधनामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भारतीय राजकारणात एक गहिरा शोक पसरला आहे. त्यांच्या योगदानाला एक आदरांजली म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनीही त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...