मगर महाविद्यालयामध्ये आविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता व संशोधन वृत्तीस प्रोत्साहन मिळते : डॉ. प्रशांत साठे
आविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता व संशोधन वृत्तीस प्रोत्साहन मिळते : डॉ. प्रशांत साठे
पुणे हडपसर: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शैक्षणिक व संशोधन समन्वय समितीच्यावतीने विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीस चालना मिळावी यासाठी दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन व आंतर महाविद्यालयीन स्तरावर, अविष्कार रिसर्च स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी बीएमसीसी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रशांत साठे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते.
डॉ. प्रशांत साठे यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा उगम त्यांचे कुटुंब, महाविद्यालय आणि भोवतालच्या परिसरातूनच होत असतो. छोटे छोटे शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, पर्यावरणीय व नागरिक प्रश्न पडणे आणि ते सोडवण्याचे उपाय शोधणे म्हणजेच अविष्कार स्पर्धेची तयारी असते. आविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता व संशोधन वृत्तीस प्रोत्साहन मिळते असे सांगून विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित केले.
महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करून मुलांना संशोधनासाठी स्वतःच्या कल्पनाशक्तीचा कसा उपयोग करावा यावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन स्तरावर अशा व्याख्यानांचे आयोजन केल्याने मुलांमध्ये संशोधनाविषयी आवड निर्माण होते व त्यांच्यात संशोधनाबद्दल सकारात्मक बदल होऊन उच्च शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी या व्याख्यानाचे प्रायोजन केले होते, असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. लतेश निकम, डॉ. सुनिता दानाई- तांभाळे,डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. शुभांगी शिंदे, प्रा. शैला धोत्रे, प्रा. सविता भुजबळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सुनिता दानाई- तांभाळे, सूत्रसंचालन प्रा. सविता भुजबळ, पाहुण्यांचा परिचय डॉ. सविता कुलकर्णी यांनी केला तर आभार प्रदर्शन डॉ. लतेश निकम यांनी केले.




Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...