अण्णासाहेब मगर महाविद्यालयात 'सायबर महागणपती' उत्साहात साजरा: रांगोळीतून सायबर सुरक्षेचा संदेश पुणे हडपसर : २८ ऑगस्ट २०२५ क्विक हिल फाउंडेशन अंतर्गत आज अण्णासाहेब मगर महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त "सायबर महागणपती"चे अनोखे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील, आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश आरतीने झाली, ज्यामध्ये "सायबर महागणपती"ची विशेष आरती घेण्यात आली. आरतीचा मान प्रमुख पाहुणे आणि प्राचार्यांना देण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गणपतीच्या विविध रूपांसोबतच सायबर सुरक्षेचे महत्त्व दर्शवणारी आकर्षक रांगोळी रेखाटली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश रांगोळीच्या कलेद्वारे सायबर फसवणुकीपासून स्वत...
AnswerTak
This Website about Maharashtra Yojana, Marathi News, information in Marathi, Learns more about GR, List, Aaple Sarkar, Bhashan, and Entertainment