अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘Mass Gathering and Oath taking’ उपक्रम यशस्वी हडपसर, पुणे: दि. १२ ऑगस्ट २०२५ अण्णासाहेब मगर महाविद्यालयात मास गॅदरिंग आणि शपथ विधी हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात सायबर सुरक्षा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. तसेच उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, संगणक शाखेचे प्रमुख डॉ. विलास वाणी, प्रा. डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. जयश्री अकोटकर आणि प्रा. मनीषा गाडेकर उपस्थित होते. याशिवाय महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थीही उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पी.एस.आय सागर पोमन यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण आणि सोशल मीडिया ॲप्सचा ...
This Website about Maharashtra Yojana, Marathi News, information in Marathi, Learns more about GR, List, Aaple Sarkar, Bhashan, and Entertainment